• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

निमगाव केतकीकरांना निधीच्या बाबतीत माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून झुकतं माप – श्रीराज भरणे यांचे प्रतिपादन

निमगाव केतकी येथे श्रीराज भरणे यांचे शुभहस्ते बंधाऱ्याचे पाणीपुजन

निमगाव केतकीकरांना निधीच्या बाबतीत माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून  झुकतं माप – श्रीराज भरणे यांचे प्रतिपादन

निमगाव केतकी ता. 13 :दत्तामामांच्या राजकिय वाटचालीमध्ये निमगावकरांनी अडचणीच्या काळामध्ये मोलाची साथ दिली आहे.त्यामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरणे मामा जेव्हा-जेव्हा निधी मंजूर करून आणतात,त्यामध्ये निमगाव केतकीला नेहमीच झुकते माप देत आहेत. असे प्रतिपादन श्रीराज भरणे यांनी दिली.
निमगाव केतकी ता.इंदापूर येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या काळेवस्ती येथील बंधाऱ्यातील पाणीपुजन श्रीराज भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले,यावेळी ते बोलत होते.या ठिकाणी दोन बंधाऱ्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुमारे ३२ लाख रूपये निधी मंजूर केला होता.या बंधाऱ्यामुळे आसपासच्या भागातील जवळपास १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना श्रीराज भरणे यांनी सांगितले कि,तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने माननीय भरणे मामांना आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे,त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता भरणे मामा इमाने-इतबारे तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मदतीला कायम धाऊन जात असून कुणाचे दवाखान्याचे काम असो,कुणाचे शिक्षणाचे काम कसो,कुणाला कसलीही अडचण असो दत्तामामा व्यक्तीश: नागरिकांच्या अडचणी सोडविण्यामध्ये दिवस-रात्र व्यस्त असतात.
तसेच विकासाच्या बाबतीत तर मामा कुठून कसा निधी आणतात याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही,परंतु इतर मतदार संघाच्या तुलनेत आपल्या तालुक्यातील विकासकामांसाठी करोडो रूपयांचा निधी मामांच्या प्रयत्नातून सहजासहजी मंजूर होत असतो,हे तालुकावासियांना माहित असल्याचे सांगत पुढे बोलताना ते म्हणाले कि,बाकीच्या तालुक्यामध्ये दहा-वीस लाख रूपयांचा निधी मिळवायचा म्हटलं तरी गावकऱ्यांना खूप पाठपुरावा करावा लागतो.मात्र इंदापूर तालुक्यामध्ये मामांच्या माध्यमातून चालता-बोलता कोटी-कोटी,दोन-दोन कोटी रूपये निधी मंजूर होत असल्यामुळे अलीकडच्या काळात आपल्या कार्यकर्त्यांना दहा-वीस लाख रूपये म्हणजे अगदी किरकोळ रक्कम वाटत असल्याची मिश्कील टिप्पणीही श्रीराज भरणे यांनी केली.यावेळी सरपंच प्रविण डोंगरे,उपसरपंच मधुकर भोसले,संदीप भोंग,ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापूरे,सागर मिसाळ,अजित मिसाळ,संतोष जगताप,माणिक भोंग,कमल राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान तयार व्हावा.  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निमगाव केतकी येथे प्रतिपादन

इंदापूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान तयार व्हावा. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निमगाव केतकी येथे प्रतिपादन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group