इंदापूर ता. 29 : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर येथील महाविद्यालयास नॅक समिती ( राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद) चा बी प्लस दर्जा मिळाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ अंकुश आहेर यांनी दिली.नुकतीच महाविद्यालयास नॅक समितीचे अध्यक्ष मिझोराम विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक संजय कुमार व समन्वयक सदस्य डॉ एडविन ज्ञानदास यांनी भेट देवून महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रम, उपक्रम ,अध्यापन व अध्ययन मूल्यमापन,संशोधन व सामाजिक उपक्रम,भौतिक सुविधा,विद्यार्थी केंद्रित उपक्रम ,महाविद्यालय प्रशासन ,सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती घेत पाहणी करून त्याबाबतचा अहवाल कमिटी ने नॅक कार्यालयाकडे सादर केल्यानंतर महाविद्यालयास बी प्लस ग्रेड प्राप्त झाली आहे .इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयास नॅक चा बी प्लस दर्जा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संस्था व महाविद्यालयातील भौतिक सुविधा सह शैक्षणिक दर्जा व विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून सर्व घटक योगदान देत असल्यामुळे महाविद्यालयास बी प्लस दर्जा मिळाला असल्याचे सांगीतले.
महाविद्यालयास नॅक चा बी प्लस दर्जा मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे,वीरबाला पाटील,कुलदीप हेगडे,शंकरराव रणसिंग,राही रणसिंग यांनी प्राचार्य डॉ अंकुश आहेर, नॅक समन्वयक डॉ विलास बुवा,आय क्यू एस सी समन्वयक डॉ प्रशांत शिंदे, डॉ.सुहास भैऱट,डॉ. विजय केसकर,प्रा.राजेंद्र कुमार डांगे,डॉ रामचंद्र पाखरे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, प्रा विनायक शिंदे,प्रा ज्योत्स्ना गायकवाड,प्रा. मयूरी पाटील, प्रा अभिजीत शिंगाडे ,प्रा बबन साळवे यांचे अभिनंदन केले.
फोटो ओळ – कळंब ता इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय