शेटफळगढे, ता 18 – शेटफळगढे (ता.इंदापुर )येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तालीम यांनी दीपावलीच्या पाडव्यानिमित्त शेटफळगढे आणि पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा ठसा उमटून यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. नागेश्वर मंदिर सभामंडपात गावचे सरपंच राहुल वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सरपंच वाबळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ग्रामस्थांच्या वतीने दिल्या. यावेळी कु. मृणाली शेलार सहायक विद्युत अभियंता, कु. पुनम झगडे गटशिक्षणाधिकारी, डॉ. ओंकार शेलार, डॉ. प्रितीश वाबळे,डॉ. गौरव सवाणे, डॉ. ऋतुजा सिरसट, पै. अजित शेलार पै. सुरज कदम , पै. सुदर्शन कदम, पै. रोहीत शिंदे, पै. मोशिन शेख, पै. यश शेलार पै. मेघराज काजळे, गौरव झगडे , किरण सवाणे आय. आय. टी, अथर्व झगडे सर्व क्षेत्रातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वाबळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष माऊली भोसले माजी सरपंच शंकर वाबळे, माजी उपसरपंच अनिल वाबळे, उपसरपंच सोमनाथ सवाणे, अण्णा सिरसट , विजय धुमाळ, माजी सभापती हनुमंत वाबळे, पोलीस पाटील रखमाजी सवाणे, अशोक जगताप तसेच विविध देवस्थानचे आजी-माजी सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य अध्यक्ष तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज तालीम मधील सर्व आजी – माजी पैलवान यांच्या समवेत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात
आली.