शेटफळगढे,ता २५: अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे याबाबतची पर्यावरण विषयक बाबींची जन सुनावणी 24 नोव्हेंबरला लाकडी येथे संपन्न झाली. त्यामुळे योजना प्रत्यक्षात साकारण्याचा एक एक टप्पा पुढे जाऊ लागला असल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातील जवळपास या योजनेच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या 17 गावच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
6 फेब्रुवारी 2021 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर येथील मेळाव्यात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे पाठपुरावा व प्रयत्न करीत असलेली लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजना पुढील 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी मार्गी लागलेले असेल. असा शब्द दिला होता.
आमदार दत्तात्रेय भरणे यांनी या योजनेचा स्वतः मंत्रालयातील प्रत्येक कक्षात जाऊन पाठपुरावा केला. व अजित दादांनी दिलेला शब्द पूर्ण करीत श्री पवार यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना या योजनेसाठी जवळपास 12 मे 2022 रोजी ही योजना मार्गी लावत या योजनेसाठी जवळपास 400 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून ठेवली आहे.त्यामुळे या योजनेचा सर्वे होऊन या योजनेची निविदा प्रक्रिया डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाली आहे. सध्या या योजनेच्या संदर्भातील आवश्यक त्या सर्व जन सुनावण्या घेण्याचे काम सुरू आहे.
त्यानुसार 24 नोव्हेंबरला लाकडी (ता. इंदापूर) येथे या योजनेची पर्यावरण विषयक जन सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजने संदर्भातील सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली.त्यानुसार पर्यावरण विषयक बाबींसाठी 32 लाख रुपयांची तरतूद या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये करण्यात आली आहे त्यानुसार वृक्ष लागवडी वरती भर देण्यात येणारा आसून त्याची जबाबदारी लाभ क्षेत्रातील ग्रामपचायतीकडे येणार आहे.
त्यामुळे योजनेचा एक एक टप्पा पुढे जात असल्याने गेल्या 27 वर्षापासून चर्चेत असलेली लाकडी निंबोडी योजना आमदार दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ तीन वर्षात मार्गी लावल्याने इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र योजनेच्या कामास सुरुवात होऊन काम पूर्ण होण्यास व योजना प्रत्यक्षात साकारून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला प्रत्यक्ष पाणी मिळण्यास जवळपास आगामी पाच वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.