शेटफळगढे ता. 12 :निरगुडे (ता. इंदापूर) येथे आज 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची 74 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपाचे नेते बाळासाहेब पानसरे व मारुती वनवे आदीनी आपल्या भाषणात आपल्या भाषणात मुंडे साहेबांमुळे महाराष्ट्राचा कसा विकास झाला ग्राम विकासाला कशी गती मिळाली मुंडे साहेबांनी घेतलेला निर्णयाचा कसा पद्धतीने फायदा झाला व आजही महाराष्ट्र मुंडे साहेबांच्या विचारावर चालत आहे. हे व इतर मुद्दे आपल्या भाषणात मांडले.
तसेच यापुढील काळात मुंडे साहेबांच्या स्मृती दिनी विधायक काम करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपसरपंच ,हनुमंत काजळे, माजी सरपंच दादासाहेब भोसले , माजी सदस्य संतोष रणधीर , सरपंच प्रतिनिधी प्रदीप सोनवणे, सदस्य देवा राऊत,राजेंद्र रसाळ,संभाजी गोसावी,यशवंत केकाण, सुरज केकाण,यशवंत पानसरे,सुशील पानसरे,शिवाजी वनवे,विकास वनवे,विजय खाडे, सागर पानसरे ,सतीश साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.