भिगवण ता.16 : राज्यातील जिल्हा परिषद , नगरपालिकेच्या शिक्षकांच्या कोणत्याही मागणीबाबत शासनाची कमालीची अनास्था आहे .
सोमवारी ( ता.१७ जुलै ) रोजी पुणे जिल्हा शिक्षक समिती च्या वतीने पुणे जिल्हा परिषद मुख्यालयाच्या समोर दुपारी १२ वाजता शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी धरणे , निदर्शने, सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे
अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी निवेदनाद्व्यारे दिली आहे .
धरणे निदर्शने , सत्याग्रह करण्याचे आवाहन राज्य शिक्षक समिती चे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर , राज्य शिक्षक नेते महादेव माळवदकर , जिल्हा शिक्षक नेते शरद निंबाळकर , जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप , विभागीय संघटक चंद्रकांत डोके , जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी , जिल्हा कोषाध्यक्ष सुनील लोणकर ,संपर्कप्रमुख बापू जाधव यांनी केले आहे.
.पुणे महानगरात हद्दवाढ झालेल्या , शाळा , शिक्षक , विद्यार्थी पुणे महानगर पालिकेत वर्ग करावेत , अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्याध्यापक , केंदप्रमुख यांच्या जागा तातडीने भराव्यात . वैद्यकीय देयका साठी निधी उपलब्ध करण्यात यावा. निवड श्रेणी , वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत .
डी.सी.पी.एस .धारकांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा , तिसरा , चौथा हप्ता रोखीने अदा करण्यात यावा .आदिवासी भागात सेवेत असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी लागू करावी . दरमहाचे वेतन एक तारखेला देण्यात यावे .निवृत्त शिक्षकांची नियुक्ती तातडीने थांबविण्यात यावी.
.शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त बेरोजगार बांधवांना नियुक्ती देत ५० हजार रिक्त पदे भरण्यात यावीत. गणित , विज्ञान पदवीधर शिक्षकांना पदावनत करण्याचा तुघलकी निर्णय मागे घेण्यात यावा . सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तातडीने अदा करण्यात यावी .
२१ जून २०२३ चा बदली धोरण शासन आदेश मागे घेण्यात यावा. ऑनलाइन आणि आंतरजिल्हा बदली धोरण कायम करण्यात यावे. सर्व पदवीधर शिक्षकांना समान पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी.
जुन्या पेंशन योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी .इत्यादी मागण्या सत्याग्रह आंदोलनात करणार असल्याचे इंदापूर तालुका अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी सांगितले .