पुणे ता. 18 : महाराष्ट्र राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या ग्राहक संघटना प्रतिनिधी प्रवर्गातून अशासकीय सदस्य म्हणून दिलावर शब्बीर तांबोळी यांची जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्यांदा निवड केली आहे ग्राहक कल्याण असोसिएशन च्या संघटक पदी कार्यरत असलेले दिलावर तांबोळी यांनी त्यांच्या कामातून अनेक ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे त्यांनी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर या गावातून ग्राहक चळवळीचे काम सुरू केले होते अखिल भारतीय ग्राहक पंचायत, प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र , ग्राहक कल्याण फाउंडेशन व ग्राहक कल्याण असोसिएशन सारख्या ग्राहक हीताच्या संघटनांमधून महत्त्वाची पदे सांभाळली आहे व ग्राहक हिताची कामे केली आहेत ग्राहक जनजागृती व ग्राहक हक्काचे मोठे काम केले आहे त्यांच्या या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे ग्राहक कल्याण असोसिएशनचे अध्यक्ष राजाराम नारायण ताकवणे व कार्याध्यक्ष ॲड.अजय ताकवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलावर तांबोळी यांची शिफारस केली होती