भिगवण ता.21: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये इंदापूर तालुका विधी सेवा समिती इंदापूर व तालुका वकील संघ इंदापूर आणि भिगवन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमन मिनिमम कार्यक्रम अंतर्गत दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता,श्याम गार्डन ,एसटी स्टँड समोर ,भिगवन, तालुका इंदापूर ,जिल्हा पुणे येथे कायदेविषयक मार्गदर्शनपर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात येत आले आहे. अशी माहिती इंदापूर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री पी एल पाटील साहेब व इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड माधव शितोळे यांनी दिली..
सदर कार्यक्रमांमध्ये खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे ॲड.शरद जामदार हे पोस्को कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ॲड .ए.टी. भोसले सायबर क्राईम, इंदापूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस एस साळुंखे वाहतुकीचे नियम, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. इंदापूर न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश.श्रीमती एस डी वडगावकर मॅडम अध्यक्ष म्हणून उपस्थित राहुन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणार आहेत तसेच सदर कार्यक्रमाला इंदापूर न्यायालयातील सह. दिवाणी न्यायाधीश के सी कलाल साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक बारामती श्री आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री गणेश इंगळे साहेब , सहा पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार साहेब हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत
सदर कायदेविषयक शिबिरामध्ये भिगवन परिसरातील विविध शाळातील आठवीच्या पुढील वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी हजर राहणार आहेत त्यासाठी भिगवन पोलीस स्टेशन यांच्या वतीने आवश्यक त्या सूचना परिसरातील शाळांना देण्यात आली आहे अशी माहिती भिगवन पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांनी दिली .