बारामती ता. 31 : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे येथील विमा प्रतिनिधी श्री संजय घोरपडे यांची अमेरिका येथे जून 2024 मध्ये होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी नुकतीच निवड झाली आहे.
बारामती शाखेचे शाखाधिकारी श्री हेमंत जोशी व विकास अधिकारी श्री हनुमंत बोधले यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. आतापर्यंत पाचशेहून अधिक विमा ग्राहकांना उत्तम प्रकारे दिलेल्या सेवेमुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
तसेच ते विमा क्षेत्रातील प्रतिष्ठित गॅलेक्सी क्लब मेंबरशीपच्या प्रवेश वर्षासाठी देखील पात्र झाले आहेत.