इंदापूर ता.13 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडे शाळेतील मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या आनंदी बाजाराचे उद्घाटन राजवर्धन पाटील व भिगवण पोलीस स्टेशनचे पी आय पवार साहेब गावचे सरपंच, सौ .गोरी सोनवणे उपसरपंच हनुमंत काजळे निरगुडे चे ग्रामसेवक सूर्यकांत गायकवाड आणि केंद्र प्रमुख श्री दराडे साहेब . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल खाडे उपाध्यक्ष श्री . संदिप गायकवाड सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक श्री .औदुंबर दराडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
या आनंदी बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या आनंदी बाजारात विविध वस्तूंचे विद्यार्थ्यांनी स्टॉल देखील लावले होते. या आनंदी बाजाराचा हेतू एकच की विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढवणे, विद्यार्थ्यांना नफा तोटा चे ज्ञान होणे, खरेदी-विक्री, संवाद कौशल्य वाढवणे, गणितीय आकडेमोड समजणे, मुलांची बुद्धिमत्ता वाढवणे हा एकमेव उद्देश आनंदी बाजाराचा असतो.”भाजी घ्या भाजी… ताजी ताजी भाजी…भाजी घ्या भेळ घ्या भेळ… मावशी बोरं घेऊन जा…” अशा चिमुकल्यांच्या संवादाने निरगुडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आवार गजबजून गेले होते
निरगुडे गावातील सर्व लहान थोरांनी आनंदी बाजारात खरेदी विक्री करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत केला. उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री .औदुंबर दराडेसर , श्री.सतीश राऊतसर , संजय वणवे सर ,श्री मादळे सर श्रीम.सरगुले मॅडम,श्रीम. होळकर मॅडम , श्रीम. पुष्पा काटकर मॅडम आदिंनी परिश्रम घेतले
आनंदी बाजारात हजारो रुपयांची उलाढाल झाली, असे शाळेचे शाळेचे श्री.औदुंबर दराडे यांनी सांगितले