पळसदेव दि. ८ : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाचा निकाल १००% लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे यांनी दिली
. शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत प्रविष्ठ बारा विद्यार्थ्यांपैकी अ श्रेणी मध्ये ०२ ब श्रेणी मध्ये ०५ तर क श्रेणी मध्ये ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी शासकीय चित्रकला स्पर्धेचा निकाल ९७% इतका लागला असून एकूण प्रविष्ठ ३६ विद्यार्थ्यापैकी अ श्रेणी मध्ये ०७ ब श्रेणी मध्ये १७ तर क श्रेणी मध्ये ०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक कलाशिक्षिका उज्ज्वला वाघमारे प्रतिभा कांबळे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे पर्यवेक्षक विकास पाठक यांनी अभिनंदन केले*