इंदापूर 8 :उजनी धरण व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील आदेशानुसार दि.29 /11/23 रोजी परिपत्रक काढून उजनी जलाशयातील लहान मासळी मासेमारी करणेस प्रतिबंध केला आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तरी शासनाने वडप आणि पंडीच्या सहाय्याने मासळी मासेमारी करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मच्छिमार भोई समाज बांधवांचे शहाजीनगर येथे मंगळवारी (दि.6) दिले.
दरम्यान, राज्याचे मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीन मुनगंटीवार व उपमुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हर्षवर्धनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनखाली मच्छीमारांचा हा प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही राजवर्धन पाटील यांनी मच्छीमार बांधवांना दिली.
आंम्ही आमच्या मागणी संदर्भात प्रादेशिक उपायुक्त, मस्त्यव्यवसाय विभाग पुणे, व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांना निवेदने दिली आहेत. मात्र दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असल्याचे यावेळी श्री वर्धनी मत्स्य व्यवसाय सह. सोसायटी मर्या. तक्रारवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.
उजनी जलाशय परिसरातील आंम्ही रहिवासी व पारंपारिक मच्छिमार असून, आमचा वडीलोपार्जित पारंपारिक व्यवसाय मासेमारी आहे. तसेच आम्ही भुमीहीन असल्यामुळे आमचे उपजिवीकेचे साधन केवळ मासेमारी आहे. उजनी धरण तयार होण्यापुर्वी पासून आंम्ही भीमा नदीवर मासेमारी करून आमची उपजिवीका केली आहे. त्यानंतरही उजनी धरण झाल्यापासून याच धरणावर वडप आणि पंडी च्या सहाय्याने मासेमारी करून उपजिवीका करीत आहोत. या कालावधीत कधीच आंम्हाला वडप आणि पंडीच्या सहाय्याने मासेमारी करण्यापासून बंधन घातले नव्हते. मात्र आता बंधन घालण्यात आल्याचे भोई समाज बांधवांनी याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रश्न निश्चितपणे तातडीने मार्गी लावू, असे भोई समाज बांधवांना सांगितले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत वाघ यांचेसहे गणेश गजरे, रामभाऊ (आण्णा) जाधव, संतोष परदेशी, मनीष परदेशी, दगडू परदेशी, तलाश परदेशी, गणेश परदेशी, कमलेश परदेशी, किरण कांबळे, मनोज परदेशी, विनोद मोरे, सूर्याजी मोरे, नंदू परदेशी, संदीप मोरे, अमर मोरे आदी भोई समाज बांधव उपस्थित होते.
___________________________