इंदापूर ता.18: मदनवाडी येथील पुणे सोलापूर महामार्ग ते देवकाते वस्ती (भिगवण बारामती रोड ) पर्यंतच्या जवळपास दोन किलोमीटर अंतराचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये समाविष्ट करून घ्या व ग्रामस्थांच्या दैनंदिन वापराच्या दृष्टीने गरजेचे असणाऱा हा रस्ता मंजुर करून निघी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मदनवाडी येथील शिष्टमंडळाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आज केली.
यावर लवकरच या रस्त्याच्या कामासाठी आपण निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिष्टमंडळाला दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर, मदनवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आबासाहेब देवकाते, माजी सरपंच अजिनाथ सकुंडे, विष्णुपंत देवकाते, रामदास बंडगर प्रमोद बंडगर समीर बंडगर अनिल कायगुडे, महादेव वनवे पाटील तात्या बंडगर, सतीश शिंगाडे,ग्रामपंचायत सदस्य सतीश सकुंडे, राजु कुदळे आण्णा ढवळे, मारुती बंडगर, मनु सकुंडे, अनिल रानवरे, रवि सकुंडे राजु देवकाते, मीडिया प्रमुख आनंद देवकाते यांनी मागणी केली
गावातील ग्रामस्थांच्या दैनंदिन उपयोगी साठी हा रस्ता सर्वाधिक उपयोगी आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाची सोय लक्षात घेऊन श्री भरणे यांनी या रस्त्याच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली.
तसेच मकुआई मंदिर सभामंडपा साठी व मदनवाडी सार्वजनिक कुस्ती आखाड्यासाठीही निधी देण्याचे आश्वासन यावेळी श्री भरणे यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच यापूर्वीही मदनवाडी गावाला भरघोस निधी दिला आहे व या पुढील काळातही गावच्या विकास कामांसाठी मदनवाडीला भरपूर निधी दिला जाईल अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांना दिली.ग्रामस्थांच्या वतीने आभार विष्णुपंत देवकाते यांनी मानलं