भिगवण ता. 8 : बारामती- राशीन (मदनवाडी हद्दीतील) रस्त्याच्या कामातील अनियमितता व निकृष्ट दर्जाचे चालू आहे मुरमा ऐवजी चक्क मातीचा वापर या रस्त्याच्या कामात करण्यात आला आहे त्यामुळे या कामाची तात्काळ चौकशी करावी व रस्ता दुरुस्त करावा. अशी मागणी मदनवाडी चे ग्रामपंचायत सदस्य तेजस देवकते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारामती राशीन रोड रस्त्याचे काम सध्या मदनवाडी हद्दीमध्ये सुरू आहे सदर काम हे पूर्णपणे निकृष्ट पद्धतीने* चालू आहे कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही अंदाजपत्रकात व कामांमध्ये अनियमितता आढळून येत आहे
मनमानी पद्धतीने ठेकेदार काम करत आहे या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे मागील काही दिवसांपूर्वी अपघात होऊन गावातील एका रहिवाशाला जीव गमावा लागला होता* कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी या ठेकेदाराकडून घेतली जात नाही मुरूम ऐवजी अनेक ठिकाणी मातीचा वापर केला आहे. आपणास विनंती आपण या कामाच्या गुणवत्तेची चौकशी* करावी व त्याचबरोबर मदनवाडी हद्दीमध्ये सुरू असलेले काम करताना खूप चुका करण्यात आलेल्या आहेत स्थानिक रहिवाशांच्या भविष्यातील अडचणींचा कोणतीही दखल घेतली नसून त्याचे परिणाम भविष्यातील मदनवाडी ग्रामपंचायत नागरिकांना भोगावे लागणार आहेत तरी खालील सूचनांचा विचार करून त्यामध्ये तत्काळ बदल करण्यात यावेत अन्यथा काम बंद आंदोलन करून आम्हाला प्रशासनाला जाब विचारावा लागेल असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*मदनवाडी चौकापासून पूर्वीच्या जागी असलेल्या सर्व मोरी पूर्वी होत्या त्या ठिकाणी जशास तसे ठेवण्यात याव्यात* ड्रेनेज लाईन करताना कुठे उंच तर कुठे खाली घेण्यात आले आहेत यामागे कोणाचा तरी राजकीय दबाव असल्याचे दिसून येत असून त्या सर्वत्र अंदाजपत्रकाप्रमाणे ठेवण्यात याव्यात
रस्त्याच्या उत्तरेकडे मोठा डोंगर असून पावसाळ्यात हे पाणी रस्त्यावर न येता नजीकच्या घरामध्ये घुसून नुकसान होऊ शकते त्यामुळे सर्व मोरी तात्काळ तयार करण्यात याव्यात अन्यथा हे काम बंद केले जाईल व भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन व ठेकेदार जबाबदार राहतील. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात या रस्त्याचे कामकाज पाहणारे शाखा अभियंता श्री चौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या रस्त्याच्या कामासाठी सॉईल स्टेपीलायझेशन ही नवीन पद्धत अंमलात आली आहे या मातीत सिमेंट केमिकल मिक्स करून ती मशनरीच्या साह्याने दगडा प्रमाणे कडक बनवली जाणार आहे. त्यासाठी या नव्या पद्धतीचा वापर करून हा गावाच्या जवळ व गावात रस्ता केला जाणार आहे सध्या तक्रारवाडी जवळ याचा पहिला प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मदनवाडी येथेही अशा पद्धतीचा वापर करून त्यावर रस्ता बनविला जाणार आहे. या नव्या पद्धतीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे