शेटफळगडे ता. 22 : खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी लवकरच आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खडकवासला कालव्यातून लवकरच आवर्तन सोडले जाणार आहे.” अशी माहिती माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली
तालुक्यात सध्या पाऊस नाही .मात्र समाधानाची बाब म्हणजे या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आज अखेर जवळपास प्रकल्पात 50.टक्के अर्थात 13.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या पाणी साठ्यात प्रति दिवसाला वाढ होत आहे.
त्यातून आज अखेर जवळपास खडकवासला प्रकल्पातील खडकवासला धरणात 60.26% पानशेत धरणात 50. 14% वरसगाव धरणात 47.73% टेमघर धरणात 31.31% टक्के पाणीसाठा झाला आहे.
मात्र सध्या खडकवासला कालव्याच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत. उसाच्या लागणी देखील झालेल्या नाहीत. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले होते.
त्यामुळे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री गुणाले यांच्याशी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवर्तन सोडणे कसे गरजेचे आहे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पटवून देत आवर्तन सोडण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता श्री गुणाले यांना श्री भरणे यांनी दिल्या.
या सूचनेनुसार खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याच्या शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे याचा इंदापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
————————————–