• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

अन् क्षणार्धात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्तेच बनले गावोगावच्या विकास कामांचे उद्घाटक…

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कृतीचे सर्वत्र होतेय कौतुक..*

अन् क्षणार्धात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्तेच बनले गावोगावच्या विकास कामांचे उद्घाटक…

भिगवण ता .23 आमदार दत्तात्रय भरणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी कायम असतात.सार्वजनिक जिवनात काम करत असताना त्यांनी सातत्याने आपल्या साधेपणाचा आणि अनोख्या कार्यशैलीचा आदर्शवाद समाजाला घालून दिला आहे.आजमितीच्या गावगाड्यातील शेवटच्या माणसाबरोबर २४ तास थेट संपर्कात असणा-या आमदार भरणे यांच्यासारखा दांडगा जनसंपर्क उभ्या महाराष्ट्रात अपवादात्मकच पहायला मिळेल.
आज आमदार भरणे यांचा असाच एक अनोखा अंदाज तालुकावासियांना पहायला मिळाला

.त्याचे झाले असे की,आ.भरणे यांनी नुकतीच जलसंधारणाच्या विभागाच्या सुमारे ५० कोटीच्या विकासकामांवरील स्थगिती उठविण्यामध्ये यश मिळवले आहे.या कामांचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी १०:०० वाजता करण्याचे योजिले होते.या विषयी गावोगावच्या कार्यकर्त्यांना सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना आमदार भरणे यांच्याकडून दोन-चार दिवसांपूर्वी मिळाल्या होत्या

.त्यामुळे कार्यकर्त्यांनीही उद्घाटन फलक तसेच ठिकठिकाणी आमदार भरणे यांचे स्वागताचे फ्लेक्स लावून जय्यत तयारी केली होती.तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ होणार होता.

परंतु सर्वत्र सकाळी दहा ची वेळ दिल्याने कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले होते.त्यामुळे आपल्या गावात आ.भरणे नेमके कधी येणार!याविषयी गावकरी अनभिज्ञ होते.आपल्या गावामध्ये उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार भरणे मामा नेमके कधी येणार याची उत्सुकता गावकऱ्यांना लागली होती.

तर दुसरीकडे भरणेवाडीला आमदार दत्तात्रय भरणे यांचा नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजल्यापासून जनता दरबार चालू होता.आपल्या अडीअडचणी घेऊन हजारो नागरिक आमदार भरणे यांच्या निवासस्थानी आले होते.त्यामुळे ते जमलेल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यामध्ये मग्न होते.

.एवढ्यात जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ यांनी दहा वाजायला थोडाच अवधी राहिला असून गावगावचे कार्यकर्ते फोन करून मामा कधी येणार आहेत म्हणून विचारत असल्याचे आमदार भरणे यांना सांगितले.यावर ते क्षणभर शांत बसले

आणि अचानक आपला स्वीय सहाय्यक अनिकेत जाधव यांना क्षणार्धात गावोगावच्या कार्यकर्त्यांना निरोप द्यायला लावत,बाकीच्या पुढऱ्यांसारखा मी प्रसिद्धीला आणि नारळ फोडायला हपापलेला नसुन,आपण केल्याला कामाचा कसलाही गाजावाजा करायची मला हौस नाही.

सामान्य कार्यकर्ताच माझा प्रसिध्दीमाध्यम असून मी आमदार म्हणजेच तुम्ही कार्यकर्ते आमदार आहात.त्यामुळे माझ्या येण्याची वाट न बघता आपापल्या गावातील उद्घाटने उरकून घेण्याचा सांगावा त्यांनी धाडला.आणि लागलीच एका क्षणात सामान्य कार्यकर्तेच उद्घाटक बनून आपापल्या गावांमध्ये भूमिपूजन समारंभ करू लागले.

त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अनपेक्षितपणे दिलेल्या सुखद धक्क्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला मात्र उदान आले होते.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः उपस्थित राहत काळेवाडी,पळसदेव,भावडी आणि न्हावी या ठिकाणी भूमिपूजन केले तर जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,प्रशांत पाटील,श्रीमंत ढोले,हनुमंत कोकाटे,शिंदे सर,सचिन सपकळ,,दिपक जाधव,हनुमंत बंडगर,शहाजी पाटील,नवनाथ रूपणवर, सुभाष पाटील,सचिन देवकर,दादा सूळ, किरण बोरा,संदीप माने,संजय देवकर,सचिन काळे,शुभम निंबाळकर,विजय घोगरे,कैलास शिंदे,सतीश पांढरे, अतुल झगडे,हामा पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी उर्वरित ठिकाणचे कार्यक्रमाचे नियोजन केले.
एकूणच आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या अनपेक्षित सुख:द धक्क्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे श्री.भरणे यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026
*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

April 26, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष .राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी  साजरा

दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष .राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group