भिगवण ता.23 : जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथिची जाणावा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून काम करणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राणादादा सूर्यवंशी यांच्या 21 जुलै 2023 रोजी असलेला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.
निसर्गाप्रती असलेले प्रेम त्याची जोपासना करण्यासाठी स्वामी चिंचोली भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये विविध प्रकारच्या रोपट्याचे वृक्षारोपण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सामाजिक बांधिलकीचे भावनेतून कुरकुंभ ता. दौंड येथील अविश्री बाल सदन अनाथ आश्रमामधील मुलांना पावसाळी रेनकोटचे वाटप जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात येऊन त्यांच्या समवेत केक कापून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनाथबालकांच्या त्यांच्या सुप्त गुणांना कलागुणांना वाव देण्यासाठी श्रावणबाळ अनाथ आश्रम येथील मुलांना संगीत साहित्याचे खाऊचे वाटप करण्यात आले.
राणा दादांनी आयुष्याच्या मावळतीला असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मायेचा हात देत निराधार असणाऱ्या वृद्धांना वाढदिवसाच्यानिमित्त येथील वृद्धाश्रमाला वृद्धांची तहान भागावी व त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी 230 लिटरचा रेफ्रिजरेटर भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना फळांची वाटप केले.
महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या चर्चा करतो पण त्यांच्या विकासासाठी आपण काहीतरी केले पाहिजे आपण त्यांचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पिढीत दुर्लक्षित महिलांसाठी व त्यांच्या मुलांसाठी काही करण्याची तळमळ म्हणून बोरी तालुका इंदापूर येथील पिढीत महिला वर्करच्या मुलांसाठी चालवण्यात येत असलेल्या बाल विकास केंद्र येथे शिकत असलेल्या मुलांना अधिक स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे 25 लिटरचा वाटर प्युरिफायर भेट म्हणून देण्यात आला.
तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. समाजातील शरीराने विकलांग असलेल्या माणुसकीचा हात म्हणून कऱ्हावागज ता. बारामती येथील निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किराणा साहित्याचे वाटप करून मूकबधिर मुलांच्या समवेत केक कापून मुलांना खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी डॉ. सचिन बेरे, श्री. संदीप शहाणे, प्रा. जीवनकुमार सोडल, प्रा. प्रिती काळे, प्रा. विपुल त्रिवेदी, प्रा. स्नेहल जमदाडे, सौ. ज्योती झोरे, प्रा. पूजा बनसोडे, प्रा. रोहन जाधव, श्री. रियाज शेख, कु. सोनाली बेलदार तसेच आश्रम तालुक्यातील अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.