• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

मुलींनो कोणी त्रास देत असल्यास निर्भयपणे तक्रार द्या, नाव गोपनीय ठेवले जाईल

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन

मुलींनो कोणी त्रास देत असल्यास निर्भयपणे तक्रार द्या, नाव गोपनीय ठेवले जाईल

निलेश चांदगुडे प्रतिनिधी
अहमदनगर, ता. 25 : घरी किंवा शाळेच्या परिसरात कोणी त्रास दिल्यास संबंधित व्यक्तीची तक्रार निर्भयपणे पोलिसांना द्या, तक्रार आल्यास छेड काढणाऱ्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले.

तसेच, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास बदनामी होईल, या भीतीमुळे काही मुली तक्रार करत नाहीत. त्यामुळे असे न करता त्रास देणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्या, तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.

.केडगावातील अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करीत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव बोलत होते. मुलींची छेडछाड, पाठलाग करणे, मोबाईल वरून त्रास देणे असे प्रकार होऊ नये, यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव शहरातील शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करत आहेत.

आतापर्यंत शहरातील पाच शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. शाळेत येता-जातांना, क्लासेसच्या ठिकाणी, प्रवास करताना कुणीही छेड काढल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, मुलींना तक्रार करण्यासाठी शाळेत तक्रार पेटी लावली जावी, मुलींना त्रास होत असल्यास त्यांना शिक्षकांकडे तक्रार द्यावी ,

अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पोपट घोडके, गुरुकुल प्रमुख कैलास आठोरे, राजेंद्र जाधव, सिताराम जपकर,भरत कासार, जयश्री बामदळे, रोहिणी दरंदले, लक्ष्मण रोडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश खामकर व संतोष जरे ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश ढगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुणा दरेकर यांनी मानले.
…………………………………………….
कोणी त्रास दिल्यास अशी करा तक्रार
मोबाईल वरून विनाकारण मेसेज करणे, पाठलाग करणे, प्रवासात स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वाईट उद्देशाने टक लावून पाहणे अशा प्रकारे छेड काढणाऱ्याची तक्रार पोलिसांना द्यावी. पोलिस स्टेशनच्या ०२४१ २४१६११७ किंवा ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच ७७७७९२४६०३ या पोलीस निरीक्षक यादव यांच्या क्रमांकावर मेसेज करून सुद्धा तक्रार करू शकता.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
वालचंदनगर उपविभागाचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे यांचा सत्कार

वालचंदनगर उपविभागाचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे यांचा सत्कार

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group