शेटफळगढे ता. 26 : महावितरण चे:वालचंदनगर उपविभागाचे नव्याने रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे यांचा इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष संदीप चांदगुडे व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष व सुशिक्षित बेरोजगार विद्युत ठेकेदार असोसिएशन बारामतीचे सचिव अविनाश चांदगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यापूर्वीचे उपकार्यकारी अभियंता श्री सुळ यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवरती श्री गलांडे रुजू झाले आहेत.
श्री. गलांडे साहेब यांनी या आधी जेऊर (ता. करमाळा) या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर बदलांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 जुलै 2023 रोजी त्यांनी वालचंदनगर उपविभाग या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे आहे.
मंगळवारी 25 जुलैला संदीप व अविनाश चांदगुडे यांनी श्री गलांडे यांच्या कार्यालय जाऊन सत्कार केला.
तसेच म्हसोबावाडी गावच्या घरगुती व शेतीपंपाची नवीन विद्युत जोड याविषयी चर्चा केली . यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन श्री गलांडे यांनी अविनाश व संदीप चांदगुडे यांना दिल.
———————————-