पळसदेव ता. 5 : येथील पळसनाथ विद्यालयाच्या वैष्णवी सपकळ आणि वैष्णवी गायकवाड या विद्यार्थ्यांनीची एन .एम .एम. एस परीक्षेअंतर्गत सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बी एस काळे यांनी दिली.
भारत सरकारच्या वतीने इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यातील गुणवंत मराठा समाजातील मुलामुलींसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यालयाच्या या पात्र विद्यार्थीनींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणासाठी वार्षिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बळवंत निंबाळकर ,संतोष पवार ,नितीन कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे ,सचिव योगिराज काळे , सर्व संचालक मंडळ , विद्यालयाचे प्राचार्य बी एस काळे ,पर्यवेक्षक विकास पाठक यांनी अभिनंदन केले आहे.*