शेटफळगढे ता.8 : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन तालुक्यात केवळ सात दिवस चालले. व लगेचच बंद झाले.
एकीकडे खडकवासला प्रकल्पातील धरणे फुल असताना तालुक्यात सात दिवस आवर्तन चालूनही तालुक्यातील आजी-माजी नेतेमंडळी मात्र कुल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला कोण धावणार व खडकवासल्याचे बंद झालेले आवर्तन पुन्हा आजी माजी नेते आणणार का ? याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती आहेत . उसाच्या लागणी देखील झालेल्या नाहीत . तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उभ्या असणाऱ्या उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले आहे .
मात्र सध्या खडकवासला प्रकल्पातील सर्वच धरणात धरणामध्ये जवळपास 80 टक्के पाणी साठा झाला आहे . मात्र तरीही जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यासाठी सोडलेले आवर्तन केवळ सात दिवसातच बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या सात दिवसात शेतकऱ्यांच्या सिंचनाला पाणीच न मिळाल्याने आवर्तन सुटूनही काहीच उपयोग झाला नाही.
अशातच सध्याही पावसाने उघडीप दिली आहे. कालव्याचेही आवर्तन नाही. विहिरी व कुपनलिका यांचे भूमिगत जलस्रोत जवळपास आठले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात उभी असलेली पिके सध्या वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी पुन्हा आवर्तन सोडणे गरजेचे आहे. या आवर्तनासाठी कोणते नेते मंडळी प्रयत्न करणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मागील विधानसभा निवडणुकी वेळी खडकवासला प्रकल्पातील शेती सिंचनासाठी येणाऱ्या आवर्तनांचा विषय गाजला होता त्यामुळे पावसाभावी सध्या अडचणीत चाललेल्या शेतकऱ्यांना सध्या गरजेच्या वेळी खडकवासल्याच्या आवर्तनाच्या बाबतीत कोण मदतीला धावणार ? हा देखील महत्त्वाचा विषय बनला आहे. कारण याच विषयाचा आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा व विधानसभा या निवडणुकांवर मतदानाच्या बाबतीत परिणाम होणार आहे. त्यामुळे या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
————————————-
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]