• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत

तत्काळ निरा नदीत पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत

बावडा ता. 9 : इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी व त्यावरील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अशातच सध्या निरा नदीवर असणाऱ्या जवळपास सर्वच धरणांमध्ये जवळपास 90 टक्के पाणीसाठा झाला आहे त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रतिवर्षी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस हा 15 ऑगस्ट पर्यंत कमी होत असतो त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर नीरा नदीवरील असणारे सर्व बंधारे धापे टाकून पाण्याने पूर्ण भरून घेतले जातात. मात्र यावर्षी अद्याप नीरा नदीत पाणी सोडले गेले नसल्याने नीरा नदी व त्यावरील बंधारे सध्या कोरडे आहेत. तर बंधाऱ्या जवळच्या भागात अल्प प्रमाणात खोरोची पासून ते नरसिंहपूर पर्यंत पर्यंत पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.. त्यामुळे नीरा नदी परिसरातील इंदापूर तालुक्यातील गावच्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम काही प्रमाणात होत आहे.

अशातच   धरण परिसरातील पाऊस साधारणपणे ऑगस्ट महिन्यात उघडतो. त्यामुळे प्रतिवर्षी जून पासूनच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरा नदीत पाणी सोडले जाते. व बंधारे भरण्यासाठी बंधाऱ्यांचे ढापे अर्थात गेटही 15 ऑगस्टनंतर लगेचच टाकून पाणी बंधाऱ्यात अडविले जाते.
त्यामुळे प्रतिवर्षी नदी व त्यावरील बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरलेले असायचे.

परंतु या पावसाळ्यात निरा नदीत प्रतिवर्षीप्रमाणे पाणी न सोडल्याने सध्या निरा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. व ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडल्याचे कारण पुढे करून जलसंपदा विभागाने पाणी सोडले नाही तर  शेतकऱ्यांना आपली पिके यापुढील काळात कशी टिकवायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. .
त्यामुळे जलसंपदा विभागाने नीरा नदीत तत्काळ पाणी सोडावे. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याचबरोबर आपली शेती वाचवण्यासाठीी शेतकऱ्यांनी राजकीय मतभेद विसरून नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
स्वातंत्र्यदिनी पिंपळे येथील सुनील बागल यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत इंदापूरच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

स्वातंत्र्यदिनी पिंपळे येथील सुनील बागल यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत इंदापूरच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group