शेटफळगढे ता. 11 : शेतकऱ्याची चांगली जमीन पोंधवडी पाझर तलावासाठी संपादित करून त्या बदल्यात शासनानेच दिलेली जमीन वन विभागाने काढून घेतल्यामुळे स्वातंत्र्यदिनी पिंपळे तालुका इंदापूर येथील शेतकरी सुनील साहेबराव बागल यांनी आपल्या कुटुंबासह इंदापूर येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
मौजे पिंपळे येथील शेतकरी साहेबराव हरिबा बागल यांची वडिलार्जित जमीन पोंधवडी येथील गट नंबर 229 हि भोगवटा वर्ग एक ची जमीन शासनाने पोंधवडी व पिंपळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून संपादित केलेली होती व सदर ठिकाणी पोंधवडी तलाव आजही अस्तित्वात आहे .
असे असताना पुढे सदर शेतकरी साहेबराव बागल यांना सन 1971 साली पिंपळे येथील जमीन गट नंबर 15 /2/अ ही जमीन शासनाने सुरुवातीला एक साल कबूललायतीने व त्यानंतर पुढे मा.तहसीलदार इंदापूर यांच्या आदेशाने योग्य त्या कागदपत्राची शहानिशा करून तसेच सदर शेतकऱ्याकडून सन 1983 साली सदर जमिनीची कायमस्वरूपी लागवडीने देणे कामी असलेली शासनाची अनर्जित रक्कम उप कोषागारात भरून घेऊन सदरची जमीन शेतकऱ्याला कायमस्वरूपी लागवडीसाठी दिलेली होती
व त्याप्रमाणे सदर जमिनीच्या सातबारा पत्रके फेरफार नंबर 222 ने साहेबराव हरिबा बागल यांच्या नावाची नोंद पाच हेक्टर 87 आर इतक्या मिळकतीला झालेली होती व आहे. म्हणजेच सदर शेतकऱ्याच्या ताब्यात शासनाच्या आदेशाने सन १९७१ पासून सदरची जमीन होती. सदर जमिनीमध्ये शेतकरी साहेबराव बागल यांचा मुलगा श्री सुनील बागल यांनी राहण्यासाठी घर. जनावरांसाठी गोठा तसेच विहीर पाईपलाईन आणि जमिनीची लेवल करण्यासाठी खाजगी सावकारांकडून लाखो रुपये कर्ज घेउन खर्च केलेला होता.
तसेच सदर जमिनीमध्ये डाळिंब ऊस कडवळ भुईमूग इत्यादी पिके घेत होते तसेच सदरची जमीन बारामती भिगवन रस्त्यालगत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला हॉटेल व्यवसाय चालू करून संपूर्ण कुटुंबाची उपजीविका करीत होते
असे असताना पुढे सन 2020 मध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना सारखी महामारी पसरलेले असताना वन विभागाला अचानक जाग येऊन वनविभागाने सदर शेतकरी अगर सध्या सातबारा उतारा वर असलेल्या कोणत्याही धारकांना साधी एक नोटीसही न देता शासनाच्या आदेशाने सदर शेतकऱ्याची चांगली जमीन संपादित करून त्याला पर्यायी जमीन म्हणून शासनाच्या आदेशाने पिंपळे येथीलवन विभागाची जमीन वाटप केलेली असताना व सदर जमिनीवर शेतकऱ्याची संपूर्ण उपजीविका चालू असताना 17 जून 2020 रोजी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनचे साह्याने सदर शेतकऱ्याच्या शेतामध्ये चार एकर मोठे डाळिंबाचे पीक .तीन एकर उभा ऊस व इतर पिके असताना शेतकऱ्यांचे घर जनावरांचा गोठा व हॉटेल यांची पूर्णतः तोडफोड केली त्यावेळेस 25 ते 30 लाख रुपये
वन विभागाने नुकसान करून सदरची जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली होती .सदर वन विभागाच्या अधिकारी यांनी कोणतेही कागदपत्राची पाहणी न करता सदर शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय केलेला होता त्याबाबत सदर शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सर्व कार्यालयात लेखी तक्रारी दिलेल्या होत्या तसेच त्याच्या प्रती मा. मुख्यमंत्री मा.उपमुख्यमंत्री. मा. महसूल मंत्री मा. वनमंत्री व इतर संबंधित सर्व खात्यांना वेळोवेळी पाठवलेल्या होत्या.
परंतु आज पर्यंत सदर शेतकऱ्यांची कोणीही दखल घेतलेली नाही . वनविभागाने साधी सदर शेतकऱ्याची चौकशी सुद्धा केलेली नाही सध्या सदर शेतकऱ्याला काही जमीन शिल्लक नाही सदर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच त्यानंतर वनविभागाच्या कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारूनही त्यावर काही एक मार्ग वन विभाग काढत नाही म्हटल्यावर सदर शेतकरी हवालदिल झालेला आहे.. सुदर शेतकऱ्यांनी न्यायालयातही धाव घेतलेली आहे परंतु शेतकऱ्यावर आलेल्या फार मोठ्या संकटामुळे तो पूर्ण कोलमडून पडलेला आहे त्यामुळे तो न्यायालयातही प्रत्येक तारखेला हजर राहू शकला नाही . सदर शेतकऱ्याची न्यायालय बाबत काही तक्रार नाही..
सुदर्शन कार्यावर वनविभागाने फार मोठा अन्याय केलेला आहे त्यामुळे शेतकरी मरणयातना सहन करत होता
त्यामुळे सदर शेतकऱ्याने क्रांतीदिना दिवशी वनविभाग इंदापूर तसेच संबंधित सर्व विभागांना लेखी निवेदन देऊन 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी आठ वाजता सहकुटुंब आत्मदहन करणार आहे असेही कळवले आहे मग त्या उपर होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नास संपूर्णतः वनविभाग आणि त्याचे संबंधित अधिकारी जबाबदार राहणार आहेत.. असे निवेदन शेतकरी सुनिल साहेबराव बागल यानी दिले आहे ..