• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

शासनाने अन्याय केलेल्या पिंपळे येथील सुनील बागल या शेतकऱ्याच्या मदतीला सत्तेतील तालुक्यातील आजी माजी नेते धावणार का?

इंदापूर तालुक्यातील जनतेचे लागले लक्ष

स्वातंत्र्यदिनी पिंपळे येथील सुनील बागल यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत इंदापूरच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

शेटफळगढे ता. 13 : शासनाने शेतकऱ्याची चांगली जमीन पोंधवडी पाझर तलावासाठी संपादित केली. त्या बदल्यात शासनानेच दिलेली जमीन वन विभागाने काढून घेतली. अखेरीस जवळपास दोन वर्ष शासन दरबारी पाठपुरावा करूनही जमीन ताब्यात मिळाली नाही अखेरीस पिंपळे येथील शेतकरी सुनील साहेबराव बागल यांनी आपल्या कुटुंबासह इंदापूर येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनाकडून खरोखरच अन्याय झालेल्या या शेतकऱ्याच्या मदतीला तालुक्यातील आजी-माजी नेते धावणार का ? याची उत्सुकता संपूर्ण इंदापूर तालुक्याला लागली आहे

मौजे पिंपळे येथील शेतकरी साहेबराव हरिबा बागल यांची वडिलार्जित जमीन पोंधवडी येथील गट नंबर 229 हि भोगवटा वर्ग एक ची जमीन शासनाने पोंधवडी व पिंपळे येथील शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून संपादित केलेली होती व सदर ठिकाणी पोंधवडी तलाव आजही अस्तित्वात आहे .

असे असताना पुढे सदर शेतकरी साहेबराव बागल यांना सन 1971 साली पिंपळे येथील जमीन शासनाची अनर्जित रक्कम उप कोषागारात भरून घेऊन सदरची जमीन शेतकऱ्याला कायमस्वरूपी लागवडीसाठी दिलेली होती सातबारा पत्रके फेरफार नंबर 222 ने साहेबराव हरिबा बागल यांच्या नावाची नोंद 5 हेक्टर 87 आर इतक्या मिळकतीला शेतकऱ्याच्या ताब्यात शासनाच्या आदेशाने सन 1971 पासून सदरची जमीन होती.

मात्र 17 जून 2020 रोजी वनविभागाने एक नोटीसही न देता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनचे साह्याने सुनील बागल या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चार एकर मोठे डाळिंबाचे पीक .तीन एकर उभा ऊस व इतर पिके असताना शेतकऱ्यांचे घर जनावरांचा गोठा व हॉटेल यांची पूर्णतः तोडफोड केली त्यामुळे जवळपास 25 ते 30 लाख रुपयाचे नुकसान केले.. व सदरची जमीन बेकायदेशीरपणे वनविभागाने ताब्यात घेतली.

याबाबत बागल यांनी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या सर्व कार्यालयात लेखी तक्रारी दिलेल्या होत्या. तसेच त्याच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. महसूल मंत्री वनमंत्री व इतर संबंधित सर्व खात्यांना वेळोवेळी पाठवलेल्या होत्या. प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनही पाठपुरावा केला. परंतु आज पर्यंत सदर शेतकऱ्यांची कोणीही दखल घेतलेली नाही . त्यामुळे बागल यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी कुटुंबीयांसमवेत आत्मदहनाचा इशारा दिला..

सध्या तालुक्यातील दोन्ही आजी माजी नेते हे सत्तेत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शासनाने अन्याय केलेल्या या शेतकऱ्याच्या मदतीला तालुक्यातील हे दोन्ही नेते धावणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून लवकरच  आवर्तन -माजी मंत्री दत्तात्रय भरणे

म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेमुळे आमदार दत्तात्रेय भरणे यांची गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता या ओळखीची राज्याला आली पुन्हा प्रचिती

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group