शेटफळगढे ता. 15 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत 201 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.. माजी उपसरपंच इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..
यावेळी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर मधून डॉक्टर तुषार शेंडगे व त्यांचे सहकारी डॉक्टर अश्विनी जाधव व ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी ( R.B.S.K )फार्मसी यांच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसोबाची वाडी या शाळेची सर्व मुलांची व विद्यार्थी विद्यार्थिनींची तपासणी केली
त्यामध्ये एकूण 201 विद्यार्थ्यांची तपासणी केली. असता त्यामध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी नॉर्मल स्थीती मध्ये आढळून आले मुख्याध्यापक सौ पाठक मॅडम व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले व सर्व विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य विषयक डॉक्टर तुषार शेंडगे यांनी मार्गदर्शन केले .