इंदापूर ता. 30 : तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता,इंदापूरसाठी जे-जे म्हणून आणता येईल यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असून कुठल्या विभागाचा कसा निधी आणायचा! यामध्ये आपण माहीर आहोत.त्यामुळे निधीच्या बाबतीत इंदापूरच्या पॅटर्नची महाराष्ट्रभर चर्चा असल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आज निरवांगी आणि घोरपडवाडी येथे सुमारे 3 कोटी 32 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार भरणे यांच्या हस्ते पार पडला,त्यावेळी ते बोलत होते.आ.भरणे म्हणाले की,आमदार म्हणून काम करताना आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य घटक तसेच गोरगरिबांच्या भल्यासाठी व गावो- गावच्या विकासासाठी झाला पाहिजे हि भावना सदैव मनामध्ये ठेऊन आपण जनकल्याणाचे प्रश्न मार्गी लावत असतो.शेवटी काम करत असताना जनतेविषयी मनामध्ये तळमळ असल्यामुळे माझ्या तालुक्यासाठी जास्तीत – जास्त निधी कसा आणता येईल,यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो.आणि सुदैवाने आपल्याला निधी मिळवण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान निरवांगी (जाधववस्ती) येथील महिला भगिनी तसेच नागरिकांनी काळूबाई मंदिरासाठी सभामंडप,जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीची मागणी आमदार भरणे यांच्याकडे केली असता,त्यांनी त्वरित या मागणीची दखल घेत काळुबाई सभामंडपसाठी ५ लक्ष,शाळेच्या दुरूस्तीसाठी १० लक्ष तसेच जाधववस्ती रस्त्यासाठी वाढीव १० लक्ष ताबडतोब मंजूर करण्याचे जाहीर केले.त्यामुळे आ.भरणे यांच्या या कृतीचे गावकऱ्यांनी कौतुक केले.
यावेळी घोरपडवाडी ते हगारेवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग,युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,गजानन लंबाते,सरपंच राजेंद्र चंगण,अजिनाथ कांबळे,राजू कवितके, डॉ गोरे ,विठ्ठल पवार,महेश रासकर,पिंटू निगडे,रणजित रासकर,समिर पोळ,अंकुश जाधव,बापू माने,अशोक जाधव,मनोज जाधव,शिवाजी जाधव,शशिकांत माने,उमेश जाधव,अक्षय देवकर,कैलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.