भिगवण ता.3 : सकल मराठा समाज भिगवन आणि भिगवन परिसराच्या वतीने तसेच भिगवन परिसरातील सर्व सामाजिक संघटना .राजकीय पक्षांच्या वतीने जालना येथे झालेल्या मराठा आंदोलकावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा आंदोलक मनोज पाटील व इतर आंदोलकांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज असल्याचे जाहीर करण्यात आले
सदर आंदोलनामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ. ग्रामपंचायत भिगवन ग्रामपंचायत तक्रारवाडी ..भोई समाज संघटना इंदापूर ..अखिल भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट .अमर बौद्ध युवा संघटना भिगवन.अखिल भारतीय कुंची कोरवे समाज भिगवन .मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर ..पिराचा दर्गा मज्जित ट्रस्ट भिगवन ..भिगवन पत्रकार संघ .. इत्यादी संघटनांनी आजच्या या रास्ता रोकोला पाठिंबा दिलेला होता
सदर रास्ता रोकोच्या प्रसंगी अशोक भाऊ शिंदे .सचिन बोगावत .जावेद भाई शेख .मराठा वनवास यात्रेचे योगेश केदार .आरपीआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम भाऊ शेलार .अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप .मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्ष डॉक्टर पद्मा खरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये भिगवन आणि भिगवण परिसरातील सकल मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झालेले होते तसेच भिगवन परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात हजेरी राहून आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता मराठा समाजाचे आंदोलकांची जालना येथे झालेल्या घटनेबाबत अतिशय तीव्र पडसाद उमटत होते. सदर आंदोलनाच्या वेळी उपस्थित महिला भगिनी व मराठा महासंघाचा अपंग कार्यकर्ता यांच्या हस्ते इंदापूरचे नायब तहसीलदार ठोंबरे साहेब भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले
सदर आंदोलनामध्ये मराठा महासंघ भिगवण शाखेचे व परिसरातील शाखांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते सदर आंदोलनाचे आभार प्रदर्शन इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर सर यांनी केले..