पळसदेव ता.6 : . क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंदापूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाच्या मल्लांनी चमकदार कामगिरी केली. मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्र इंदापूर येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्यालयाच्या अहिल्या शिंदे हिने सतरा वर्षे वयोगटात ६१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक , ६०कि. वजन गटात ओंकार गायकवाड याने प्रथम क्रमांक , ७१कि. वजन गटात ओम करे याने प्रथम क्रमांक ,८० कि. वजन गटात सूरज करे याने द्वितीय क्रमांक मिळवला . तर १९ वर्षीय वयोगटात प्रणव काळे याने प्रथम क्रमांक , ९२ किलो वजनगटात राहुल महाडिक यांने द्वितीय क्रमांक मिळवला . जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी या मल्लांची निवड झाली आहे. सर्व यशस्वी मल्लांचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक सिकंदर देशमुख नितीन जगदाळे ,सुवर्णा नायकवाडी ,रामचंद्र वाघमोडे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, संजय जाधव ,संतोष पवार वृषाली काळे ,शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते…*