शेटफळगढे ,ता 18 : इंदापूर तालुक्यात बाजरीच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे यावर्षी केवळ 61 टक्के पेरण्या झाल्या आहेत सध्या बाजरीच्या क्षेत्रात जवळपास 39 टक्क्यांनी घट झाली आहे अशी परिस्थिती दुष्काळामुळे सर्वत्र आहे त्यामुळे सध्या दुष्काळाची परिस्थिती इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यात व राज्यात असल्याने यंदा बाजरी भाव खाणार आहे. निरगुडे ,म्हसोबाचीवाडी ,अकोले, वायसेवाडी परिसरात कालव्याच्या पाण्यामुळे वाचलेली बाजरीची पिके राखणीला आली आहेत . दरवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे .मात्र खडकवासला कालव्याला पाणी आल्याने काही प्रमाणात कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी व मकेला पाणी दिल्याने ती पिके वाचले आहेत. ती बाजरीची पिके राखणीला आल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरवर्षी बाजरीचे पीक जास्त प्रमाणात असते त्यामुळे राखणी कमी करावी लागते मात्र यंदा परिसरात बाजरीचे पीकच कमी असल्याने शेतकऱ्याला राखणी करावीच लागत आहे एकीकडे पावसाने ओढ दिल्याने पीक वाया गेले आहे दुसरीकडे आता राखणी शिवाय पर्याय नाही राखणी न झाल्यास पीक पुन्हा हातातून जाईल या भीतीने शेतकरी बाजरीच्या पिकाची राखण करीत आहेत.
————————————-