शेटफळगढे ता. 28 : आशियाई विकास बँक योजनेच्या व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे वतीने रस्त्याचे काम करीत असलेल्या देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने व पारवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे सहकार्यातून पारवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देसाई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम या रस्त्याच्या परिसरातील असणाऱ्या गावांमध्ये राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील सहा महिन्यापूर्वी निरगुडे येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर 27 सप्टेंबरला पारवडी येथे या शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे चे उपकार्यकारी अभियंता मधुकर सुर्वे , शाखा अभियंता एम डी चौरे , आर ई रोकडे सर ,अंगराज वाबळे ,सुरेश अहिरे , तालुका आरोग्य अधिकारी संजय खोमणे तालुका विस्तार अधिकारी जगताप आणि त्यांचा स्टाफ. तसेच उपस्थीत देसाई इन्फ्रा कंपनीचे संचालक संतोष कदम, सतिश खैरे , साहिल नायकवडी व सर्व स्टाफ यांची उपस्थित होते.
यावेळी या शिबिरात 89 पुरुष व 21 महिला अशा एकूण 110 जणांनी आरोग्य शिबिरात लाभ घेतला. यात 95 रुग्णांची रक्त तपासणी 103 रुग्णांची डोळे तपासणी रक्तातील साखर तपासणी 90 रुग्णांची ब्लड ग्रुप टेस्ट 70 रुग्णांची तर 55 रुग्णांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.