शेटफळगढे ता.९ : रयत शिक्षण संस्थेचे,श्री नागेश्वर विद्यालय व ज्यूनि कॉलेज शेटफळगढे विद्यालयात टपाल दिनानिमित्त गुरुकुल प्रकल्प अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
भिगवणचे पोस्ट मास्तर दादासाहेब भानगिरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र गावडे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे, गुरुकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर
आदीजण उपस्थित होते.
यावेळी पोस्टमास्तर दादासाहेब भानगिरे पुढे म्हणाले की, पोस्ट खाते हे केंद्रातील महत्त्वाचा विभाग आहे.विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून देखील या खात्यात यायला हवे तसेच त्यांनी पोस्टातील विविध सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, अपघाती विमा योजना यांची माहिती दिली. यावेळी भानगिरे यांनी पोस्टाची विविध तिकिटे, लिफाफे, पोस्टकार्ड, विविध प्रकारचे अर्ज कसे भरावयाचे याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना पोस्टाची सुरुवात कशी झाली? पोस्ट खात्यातील करियर संबंधी अनेक प्रश्न विचारले. तर प्राचार्य जितेंद्र गावडे यांनी पोस्ट खात्यातील करियर व योजनांचा लाभ घेणे म्हणजे एक प्रकारची देशसेवा असल्याचे सांगितले.नवनाथ विरकर, राम तांबे, सुभाष लकडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले तसेच पोस्ट खात्याविषयीचे अनेक प्रश्न विचारले.
डॉ काशिनाथ सोलनकर यांनी पोस्टमास्तर भानगिरे यांची मुलाखत घेतली.गुरुकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. तर आभार मनीषा विरकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.
चौकट: दहावी इयत्तेत ९० टक्केहून अधिक गुण मिळाल्यास पोस्ट खात्यात तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून याकडे पहावे असे यावेळी पोस्ट मास्तर भानगिरे यांनी यावेळी सांगितले.