पळसदेव दि.१३ :. पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये उज्ज्वल यश मिळवल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे यांनी दिली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय आर्चरी (धर्नुविद्या) स्पर्धेत विद्यालयाच्या अविष्कार शिंदे यांनी प्रथम क्रमांक , तालुकास्तरीय ३००० व १५०० हजार मीटर धावणे स्पर्धेमध्ये बालाजी अडवाल यांनी प्रथम क्रमांक, तालुकास्तरीय ४०० मीटर धावणे स्पर्धेत समृद्धी शिंदे हीने द्वितीय क्रमांक तर ८०० मीटर स्पर्धेत प्रणव साळुंके याने द्वितीय क्रमांक मिळवला . यशस्वी खेळाडूंचा तसेच विद्यालयाच्या राष्ट्रीय कुस्तीपटू अहिल्या शिंदेचे पालक शत्रुघ्न शिंदे यांचा व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक नितीन जगदाळे, सिकंदर देशमुख ,सुवर्णा नाईकवाडी ,रामचंद्र वाघमोडे यांचा शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला .याप्रसंगी पळसनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे ,सचिव योगिराज काळे ,प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, तानाजी इरकल ,वृषाली काळे , संजय जाधव आदींसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले ..