इंदापूर ता. 19 : बिल्ट कंपनी मधील माथाडी प्रश्नांबाबत मां तहसिलदार इंदापूर श्री श्रीकांत पाटील यांचे दालनामध्ये मीटिंग आयोजित केलेली होती सदर मीटिंगसाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार, माथाडी बोर्ड चे निरिक्षक श्री राजेश मते , बिल्ट कंपनीचे व्यवस्थापक श्री संग्रामसिंह गायकवाड , सोमनाथ कुलकर्णी. संदीपान काळे व मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. पांडूरंग जगताप यांचे समवेत मीटिंग झाली.. त्यामधे तहसिलदार साहेब यांनी सर्व उपस्थीत संबधित लोकांकडून माथाडी कामगार प्रश्नांबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी माहिती जाणून घेऊन माथाडी बोर्डचे निरिक्षक यांना सदर प्रश्न सोडवण्यासाठी सह आयुक्त कामगार विभाग यांचे कार्यालय मीटिंग लाऊन योग्य निर्णय काढणेकामी सुचित केले आहे.
सदर मीटिंगला माथाडी कामगार प्रतिक्षा यादीतील कामगार उपस्थित होते. सदर बाबत बोलताना मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड. पांडूरंग जगताप म्हणाले की. तहसिलदार साहेब यांनी 2011पासून फार वर्ष प्रलंबित असलेल्या प्रतिक्षा यादीतील कामगाराबाबत योग्य निर्णय करण्यासाठीं चांगले पाऊल उचलले असुन त्यांचें मुळे सह आयुक्त कामगार विभाग यांचे समोर मीटिंग लावण्याचे माथाडी बोर्डचे निरीक्षक यांनी मान्य केले आहे त्यामूळे प्रतिक्षा यादितील माथाडी कामगार यांना न्याय मिळेल तसेच इतर प्रश्नांना बाबत मराठा महासंघाने 28/10/2023 पर्यंत मुदत कंपनी आणि इतर प्रशासनाला दिली आहे त्याबाबत संघटना आणि कंपनी आणि प्रशासन यांचेमध्ये पत्रव्यवहार चालू आहे परंतू बिल्ट कंपनी बाबत मराठा महासंघाने निवेदनात नमूद केलेल्या सर्व प्रश्नाची कायदेशीर मार्गाने सोडवणूक झालेशिवाय आंदोलनाचे निर्णयापासून थांबणार नाही असे मत व्यक्त केले.