इंदापूर ता. ३१ : यावर्षी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने सध्या ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे दुभत्या पशुधनांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे.
यावर्षी पाऊस नसल्याने सध्या ऑक्टोबरच्या अखेरीपासूनच पशुधनांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे अशा स्थितीत शेतकरी बागायत भागातून आपल्या दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा आणत आहेत सध्या पाऊस नसल्याने विहिरींनाही पाणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या दुभत्या जनावरांसाठी दरवर्षी असणारे मका कडवळ यांसारखी पिके यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या विहिरीच्या पाण्याच्या आधारावरती करता आलेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आता पशुधन जगवणे मुश्किल झाले आहे त्यातच एक नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू होणार असल्याने दुभत्या पशुधनांना उपयोगी असणारा उसाचा चारा सध्या शेतात उभा आहे तो कारखान्यांना गाळपणा जाणार आहे त्यामुळे सरकारने अजून जवळपास पावसाला नऊ महिन्याचा कालावधी बाकी आहे त्यामुळे दुखत्या जनावरांनासाठी चारा छावण्या सुरू करणे गरजेचे आहे.