भिगवन ता. 4 : माथाडी कामगार,कंत्राटी कामगार,स्थानिक कामगार व इतर समस्यांबाबत आपण बिल्ट पेपर कंपनी विरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला होता मात्र आंदोलनाची दखल घेऊन भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार साहेब यांचे समोर बिल्ट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आज शनिवारी बैठक पार पडली.यामध्ये बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीने दिनांक 25/ 11/ 2023 अखेर मा. कामगार आयुक्त मुंबई यांचे कार्यालयात मीटिंग घेण्याचे मान्य करून सदर प्रश्नावर तोडगा काढण्याची ठरलेले आहे.तर त्यानंतर इतर प्रश्नावरही मार्ग काढण्याचे ठरले आहे. त्यामुळे मराठा महासंघाने दिलेल्या निवेदनाला काही अंशी यश आलेले आहे. जर २५ तारखेपर्यंत याबाबत कोणता निर्णय झाला नाही तर पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे… त्यामुळे उद्या दिनांक 5/ 11/ 2023 रोजी बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीच्या मेन गेट समोर मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येणारे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.