भिगवण ता. 7: शिक्षक समितीचा 11 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढला जाणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील वाघ यांनी दिली.
5 नोव्हेंबर 2023 रोजी तुळजापूर येथे शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणीची सभा राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली._
_यावेळी राज्य नेते उदयजी शिंदे,राज्य सरचिटणीस राजनजी कोरगावकर,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत,आनंदा कांदळकर यांच्यासह कोषाध्यक्ष नंदू होळकर, राज्य संघटक राजेंद्र खेडकर,राज्य प्रवक्ते नितीन नवले,राज्य अँडीटर पंडित नागरगोजे,शिक्षक समिती जुनी पेन्शनचे प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,_पुणे जिल्हा सरचिटणीस श्री.संदिप जगताप उपस्थित होते ..
सुनील भामरे,मराठवाडा अध्यक्ष श्याम भाऊ राजपूत शिवाजी कवाळे सह सर्व विभागाचे पदाधिकारीसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष शिक्षक समितीचे सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस आदी उपस्थित होते..
_आजच्या महत्वपूर्ण सभेत प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जोपर्यंत सरकार गांभीर्याने समजून घेत नाहीत तोपर्यंत शिक्षक समिती ही संघर्ष करणारच असे राज्याध्याक्षांनी ठणकावून सांगितले._ _येत्या 11 डिसेंबर रोजी जुनी पेन्शन लागू करावी व समूह शाळा योजना मुळातच बंद करावी या प्रमुख मागण्यांसह वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरण्यात यावी या प्रमुख मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीकडून हिवाळी अधिवेशनात भव्य दिव्य असा मोर्चाचे आयोजन केले असून महाराष्ट्रभरातील शिक्षक समितीच्या सर्व शिक्षकांना दि.11 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चाचे नियोजन केले आहे._ _बीएलओ कामे, आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या,एनपीएस /डीसीपीएस धारक शिक्षकांचे प्रश्न या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली._
_सभेत सर्व जिल्हा शाखांचे लवकरच अँडीट करण्यात येणार असून सर्व जिल्हा शाखांना 31जानेवारी अखेर ऑडिटर भेटी देणार असून ते सर्व जिल्हा शाखेचे अँडिट_ _करतील त्या दृष्टीने सर्व जिल्हा शाखा यांना_ _याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत._
ज्या जिल्हा शाखांच्या निवडी झाल्या त्यांच्या निवडीचा ठराव संमत करण्यात आला._
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर नवीन संचमान्यतेनुसार जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे 2 डिसेंबर रोजीच्या शिक्षणमंत्र्यांच्या भेटीदरम्यान चर्चा झालेचे अध्यक्षांनी सांगितले.
आजच्या सभेचे नियोजन शिक्षक समिती जिल्हा शाखा धाराशिव यांनी उत्कृष्टपणे केलेले होते.
_सभा यशस्वीतेसाठी राज्य कार्यकरिणी सदस्य विलास कंठकुरे,जिल्हाध्यक्ष तथा राज्यउपाध्यक्ष बशीर तांबोळी,बाळासाहेब वाघमारे जिल्हा सरचिटणीस सतीश हुंडेकरी,बापूबेताळे,कमलाकर येनेगुरे,_
_भीमाशंकर डोकडे,बळी आलमले,सोमनाथ चिनगुंडे,बालाजी साठे,डी डी हुंडेकरी,तालुका नेते तुळजापूर,उमेश खोसे,संतोष हंगरगेकर,उमेश सुर्वे,गजेंद्र कांबळे,बिलाल सौदागर, नागनाथ देशमुख,विलास तोरसलले,बिभीषण सुरवसे,इब्राहिम चौधरी,राजू गायकवाड, चक्रे सर,शांताराम गायकवाड,बाळासाहेब घेवारे,ज्योतिर्लिंग क्षीरसागर,दत्तात्रय नलवाड,दळवी सर,बाबुराव कोकाटे,लक्ष्मण ताणले,राजेंद्र गाडे, युवराज खाडे आदिंनी मेहनत घेतली._