इंदापूर : दि.20 निरोगी शरीरासाठी प्रत्येकाने दररोज धावपळ असली तरीही थोडा वेळ काढून व्यायाम केला पाहिजे, कारण खरी संपत्ती ही तंदुरुस्त शरीर हीच आहे. धायगुडेवाडी परिसरातील विद्युत जनित्र (डी.पी.), रस्ता आदी प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.19) केले.
अकोले गावातील धायगुडेवाडी येथे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2022-23 मधून ओपन जिम साहित्याचे (रू.7 लाख) जि. प. प्राथमिक शाळा धायगुडेवस्ती येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी युवकांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
अकोले-धायगुडेवाडी परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. प्रास्ताविक रमेश धायगुडे यांनी केले. यावेळी ग्रा.प.चे उपसरपंच गणेश खाडे, माजी उपसरपंच भाऊसाहेब पडळकर, इंदापूर पं. स.चे माजी सदस्य एस. के. शिंदे, ज्ञानदेव कोकरे, माने गुरुजी, राजेंद्र कोकरे, लाला कोकरे, बाबू कोकरे, विष्णू कोकरे, मच्छिंद्र सोलनकर, विकास कोकरे, सुरेश कोकरे, महादेव धायगुडे, संपत धायगुडे, संजय धायगुडे, शरद धायगुडे, मनोज कोकरे, मल्हारी सोलनकर, संभाजी धायगुडे, अजित सोलनकर, संभाजी पडळकर आदींसह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.