शेटफळगढे ता.12 : रयत शिक्षण संस्थेचे,श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज शेटफळगढे ता. इंदापूर जि. पुणे विद्यालयात मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत मा.मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचे प्रकट वाचन करण्यात आले.
सदर पत्र विद्यार्थ्यांना घरी देण्यात आले, विद्यार्थ्यांनी पत्राचे वाचन करतानाचा सेल्फी फोटो व घोषवाक्य तयार केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र गावडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशाचे प्रकट वाचन नवनाथ वीरकर यांनी केले.
या वाचन अभियानात पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.सेल्फी व घोषवाक्य यांचा गुणात्मक दृष्टीने विचार करून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक विजेता विद्यार्थी ,त्याचे पालक व वर्गशिक्षक यांना मा मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत भेटीसाठी व भोजनासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक जितेंद्र गावडे यांनी दिली तसेच नागेश्वर विद्यालय या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.