शेटफळगढे ता. 31 : म्हसोबावाडी ते शेटफळगढे दरम्यान नुकताच झालेला डांबरी रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सरकारच्या बांधकाम विभागाच्या वतीने मागील वर्षी या रस्त्याचे काम करण्यात आले आहे नुकत्याच झालेल्या पावसाने सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनचालकांना यातून मार्ग काढताना अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे