इंदापूर दि.6 : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ इंदापूर तालुका फेडरेशनच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन इंदापूर येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (दि. 16) सकाळी 9 ते सायं. 4 या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर येथे दिली.
रोजगार निर्मितीसाठी कुशल व रोजगार क्षम युवकांसाठी नोकरी महोत्सव संधी असून, युवक वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी केले. तसेच नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबीरे खालील 3 ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.
भिगवण : सोमवार दि.12 ऑगस्ट स.10 ते दु.1, स्थळ :- कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, भिगवण.
• बावडा : मंगळवार दि.13 ऑगस्ट स.10 ते दु.1, स्थळ:-श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा
•इंदापूर : बुधवार दि.14 ऑगस्ट स.10ते दु.1, स्थळ :-कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर.
तरी इच्छुक युवकांनी बायोडाटा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे.
______________________