शेटफळगढे: रयत शिक्षण संस्थेअंतर्गत व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज येथे सक्षम कार्यक्रमांतर्गत आनंद मेळावा व खाऊगल्ली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुकुल प्रमुख तात्यासाहेब गाडेकर यांनी केले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे,प्राचार्य जितेंद्र गावडे,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या शेतामधून भाजीपाला , फळे विक्रीसाठी आणली होती .तसेच वडापाव,चहा पाणीपुरी,उत्तप्पा, भेळ ,डोसा, भजी यांखाद्य पदार्थांसोबत विद्यार्थ्यांनी बिर्याणी देखील आणलेली होती. विद्यार्थ्यांना व्यावहारीक बाबी ,देवाण-घेवाण, नफा-तोटा याची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जितेन्द्र गावडे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी हजारो रुपये यातून मिळवले. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.
विद्यार्थ्यांच्या स्टॉलला अनेक ग्रामस्थांनी भेट दिली
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे,स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे,प्राचार्य जितेंद्र गावडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच व ग्रामस्थांनी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व सेवक वृंद यांनी केले.