भवानीनगर ता. 28 : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर 595 हरकती दाखल झाल्या होत्या.
या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली असून आज या हरकतींचा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे या निकालाकडे कारखान्याच्या सभासद मतदारांचे लक्ष लागले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली होती. या प्रारूप यादीवर 20 जुलै पर्यंत हरकती दाखल करावयाच्या होत्या. या मुदतीत सभासदांनी 595 हरकती दाखल झाल्या होत्य.
यात प्रामुख्याने थकबाकीदार व तीन व पाच वर्षात एकदाही कारखान्याला गळीत हंगामासाठी ऊस न घालणाऱ्या सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा किंवा देऊ नये. अशा दोन्ही बाजूने सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत. तसेच अपक सभासद मयत सभासद यांचा मतदार यादीत समावेश असल्याच्या कारणावरूनही हरकती दाखल झाल्या होत्या.
हरकतींची संख्या ही जास्त असल्याने 21 जुलैपासून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने या हरकतींवर सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत दाखल झालेल्या हरकतींचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने दिला जाण्याची शक्यता आहे.
. हा निर्णय दोन्ही बाजू पैकी कोणा एकालाही मान्य न झाल्यास पुन्हा न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीचा निकाल काय लागतो ? याकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
तर नियोजित तारखेनुसार येत्या दोन ऑगस्ट रोजी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे .
——————————–