भिगवण ता. 29 :कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील लक्ष्मी विविध सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी काशिनाथ हरिबा धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली.
यापूर्वीचे संस्थेचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी काशिनाथ हरिबा धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी काशिनाथ धुमाळ यांनी भरलेल्या अर्जास सूचक म्हणून सुरेश धुमाळ व अनुमोदन ज्ञानदेव बंडगर यांनी दिले.
यावेळी कुंडलिक (बापू) धुमाळ, नामदेव पवार, पांडुरंग बंडगर ,उदय भोईटे, दत्तात्रेय धुमाळ, शहाजी धुमाळ. इत्यादी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून गोलांडे मॅडम यांनी कामकाज पाहिले. तसेच सचिव महादेव पवार व सहसचिव रवींद्र धुमाळ यांनी कामकाज पाहिले.