भिगवण ता. 31 : पोंधवडी (ता इंदापूर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळशीराम खारतोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी सरपंच उपसरपंच निवडीसाठी मंडलाधिकारी डी एस कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच पदाच्या निवडीसाठी स्थगिती देण्याचा आदेश दिला. त्यामुळे आज केवळ उपसरपंच पदासाठी मंडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत नियोजित वेळेत उपसरपंच पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र माघारी घेण्याच्या वेळेत तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री. खारतोडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी एस कोकरे यांनी जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नाना बंडगर, कोंडीबा पवार, गणेश पवार ,पद्मिनी भोसले ,सारिका शिंदे ,शारदा भोसले, अर्चना बंडगर, सुनीता बंडगर व ग्रामसेवक जी एस बोरावके उपस्थित होते
निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच श्री खारतोडे म्हणाले “माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गावच्या विकासासाठी भरघोस निधी आणणार आहे तसेच जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोचविणार आहे.