शेटफळगडे ता.3 : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे विहिरीचे रिंगेचे काम सुरू असताना विहिरीची रिंग कोसळून बेलवाडी येथील चार मजूर गाडले गेले आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम आज गुरुवारी दिवसभर सुरू होते
परंतु पुण्यावरून मोठ्या क्रेन आणूनही मशनरी त्यात उतरून डिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यात अपयश आले. त्यामुळे आता मजूर गाडले गेलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रॅप तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी घटनास्थळी मुरमाचा ढिगारा हटवण्याचे काम दिवसभर सुरू होते त्यानंतर क्रेनच्या साह्याने मशनरी सोडण्यात आल्या. परंतु ज्या ढिगार्याखाली मजूर गाडल्या गेलेले आहेत त्या ठिकाणी मशनरी पोचवण्यात देखील अपयश आले आहे
यावर शेवटचा पर्याय म्हणून मजूर गाडले गेलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रॅम्प तयार करण्याचे नियोजन दुपारपासून हाती घेण्यात आले आहे ते रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. तत्पूर्वी आज सकाळी विहिरीतील पाणीही काढण्यात आले जवळपास 210 अश्वशक्तीच्या सहा मशिनरींच्या साह्याने रॅम्प तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. उद्या शुक्रवारी मजुरा पर्यंत पोहोचणे शक्य होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
————————————