शेटफळगढे ता 16 : विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपण तालुक्यातील गावोगावच्या विकास मार्गी लावण्यास व जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहे. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
लाकडी (ता. इंदापूर) येथे जवळपास साडेतीन कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन श्री भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी श्री भरणे पुढे म्हणाले, ” राज्यामध्ये विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून भाजप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गट यांची महायुती झाली आहे. त्यामुळे आता विरोधकांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा गाव गावच्या व तालुक्याच्या विकासाला सत्तेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीतून गती देणार आहे.
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील भागासाठी वरदान ठरणाऱ्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे .
यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कायमचे टँकर ग्रस्त असणारे हे गाव पाणी योजना राबवल्यामुळे लाकडी गाव टँकर मुक्त झाले आहे
गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून गावातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे व आगामी लाकडी ग्रामपंचायत गावाने बिनविरोध केल्यास 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे श्री भरणे यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
गावातील आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून गावातील मागणी केलेल्या अंतर्गत रस्ते व इतर विकास कामांसाठी निधी दिला जाईल
ठेकेदार जर चुकीचे काम करत असेल तर तात्काळ काम बंद करण्याची जबाबदारी ही ग्रामस्थांची असून यापुढील काळात ग्रामस्थांनीही विकास कामे दर्जेदार करून घ्यावीत असे आवाहन भरणे यांनी यावेळी बोलताना केले
यावेळी प्रताप पाटील, सचिन सपकळ, श्रीमंत ढोले, गावच्या सरपंच द्रोपदा वणवे, बाळासाहेब खरमाटे, दादा वणवे ,महेश वणवे ,रायचंद वणवे ,आप्पा ढोले ,हरिचंद्र वणवे काशिनाथ वणवे ,संजय सांगळे, अनिल गायकवाड तुकाराम पवार , रोहित हेळकर संदीप चांदगुडे अमर भोसले यांच्यासह ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.