भिगवण ता 16 : ” मराठा महासंघाची गाव तेथे शाखा ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे.
यातून मराठा समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संघटनेचे जाळे पोचवून संघटना अधिक बळकट केली जाणार आहे
अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना श्री जगताप यांनी सांगितले,”महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा महासंघ ही संघटना अत्यंत जुनी असून स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सन 1982 साली प्रथम स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढलेला होता.
सदर मोर्चाला संबोधित करताना स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी भीष्मप्रतिज्ञा घेतलेली होती की जर शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही व त्यांनी समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी 23 मार्च 1982 रोजी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले आहे
मराठा आरक्षणासाठी राज्यामधील प्रथम बलिदान होते त्यांनी स्थापना केलेली मराठा महासंघ ही संघटना आहे त्यांच्यानंतर मराठा महासंघाची धुरा समाजामधील अनेक मान्यवरांनी पेलवली व सध्या माननीय श्री राजेंद्र जी कोंढरे साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अत्यंत सक्षमपणे काम करीत आहेत
मराठा महासंघ ही महाराष्ट्र राज्यामध्ये काम करीत असताना कोणत्याही समाजाच्या अथवा धर्माच्या विरोधी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ अथवा विरोधी काम करीत नाही
फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारी संघटना मातृ संस्था आहे ..मराठा महासंघाच्या माध्यमातून शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून सामाजिक प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न नोकरदारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐतिहासिक वास्तू किल्ले ठिकाने संवर्धनाचा प्रश्न महिलांचे प्रश्न कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर त्यात त्यांना न्याय देण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम संपूर्ण राज्यांमध्ये सोडवणारी संघटना म्हणून मराठा महासंघ कडे पाहिले जाते.
मराठा महासंघ या संघटनेमध्ये सध्या संपूर्ण राज्यांमध्ये गाव तेथे शाखा अशी मोहीम मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्रजी कोठारे साहेब व केंद्रीय कार्यकारणी यांच्या आदेशाने मोहीम चालू आहे
त्यामध्ये मराठा महासंघाचे फादर बॉडी युवक शाखा महिला आघाडी युवती आघाडी तसेच सर्व सेलचे प्रमुख आणि पदाधिकारी यांच्या संयुक्तपणे सदर काम चालू आहे याचा उद्देश मराठा महासंघाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये शाखा उघडून गावापासून चालू होणारे प्रश्न राज्य आणि राष्ट्र पातळीवर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालू आहे.
त्यानुसार नवीन नवीन पदाधिकारी सध्या मराठा महासंघ या संघटने कडे जोडली जात आहेत महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्येही सदरची संघटना मजबुतीने काम करीत आहे
परंतु प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांवर मराठा महासंघाची वाटचाल मोठ्या घोडदौडीने चालू आहे
मराठा महासंघाच्या माध्यमातून सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याचे प्रत्येक तालुक्यामध्ये महामंडळाचे अध्यक्ष व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिरे घेऊन मराठा समाजातील नवयुवकांना उद्योगासाठी विना व्याज परतावा कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे नव युवकांना व्यवसाय मार्गदर्शन दिले जात आहे.
समाजातील लोकांना कर सल्लागार यांचे मार्फत मार्गदर्शन दिले जात आहे विधी साक्षरतेचे मार्गदर्शन दिले जात आहे.
समाजाच्या कोणत्याही प्रश्नासाठी गावापासून ते मंत्रालयापर्यंत प्रत्येक प्रश्नासाठी मराठा महासंघ ही संघटना सध्या काम करीत आहे.
त्यामुळे संघटनेकडे मोठ्या प्रमाणात युवक युवती महिला तसेच पुरुष पदाधिकारी यांचा ओढा वाढलेला आहे.
संघटनेचे संघटन मजबूत करण्यासाठी या सर्वांचा फायदा होत असून संघटना अत्यंत जागरूकपणे सध्या काम करीत आहे. तसेच पुढील काळातही काम करीत राहणार आहे
त्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र जी कोंढरे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील व संयुक्त राष्ट्रीय सरचिटणीस गुलाब दादा गायकवाड तसेच जिल्ह्यातील सर्व आघाडीवरील पदाधिकारी यांना सोबत घेऊन गाव तेथे शाखा ही मोहीम राबवली जात आहे.
त्यामध्ये युवक युवती महिला पुरुषांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री जगताप यांनी यावेळी बोलताना केले.