पुणे ता. 6 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ऑगस्टला नुकताच पुणे दौरा झाला. परंतु पाच दिवस उलटूनही केवळ या एकाच फोटोची चर्चा सध्या अजूनही सर्वत्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनावेळी विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते
स्वागता वेळी श्री पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी हस्तांदोलन करताना हसत हसत या दोघांमध्ये काय संवाद झाला याची उत्सुकता पाच दिवसानंतरही सर्वांना लागली आहे
कारण चुलते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यापासून बाजूला जात अजित पवार हे आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या स्वागतावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली याचीच चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे.