शेटफळगढे ता 7 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे एक ऑगस्टला विहिरीच्या कठड्याची सिमेंटची रिंग कोसळून एक ऑगस्टला चार मजूर मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले होते. याची चर्चा चार दिवस राज्यभर झाली हे मजूर जवळपास 100 फूट खोल विहिरीत पडले होते अशा स्थितीत या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन दिवस वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या. अखेरीस चार ऑगस्टला मजुरांपर्यंत पोहोचण्याची शोध मोहीम यशस्वी झाली.
मात्र 100 फुटापर्यंतच्या रॅम्पचे काम झाले. नंतर कठीण टप्प्यावर काम करणे अवघड व धोकादायक होते. कोणतं मशीन व ऑपरेटर धोका पत्करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेरीस निरगुडे येथील विजय काळे यांचे मालकीचे मशीन स्वतः व त्यावरील ऑपरेटर अक्षय ढोले व अमोल बोराटे यांनी धाडस करून जवळपास 66 तासांच्या प्रयत्नानंतर या चार मजुरांचे मृतदेह बाहेर काढले.
तत्पूर्वी धोकादायक विहिरीतून मजूर बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेन आणूनही छोटे पोकलेन त्यात उतरून ढीगाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आले होते. मात्र त्या मोहिमेलाही अपयश आले. त्यामुळे गाडले गेलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रॅम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले . ते रॅम्पचे काम शेवटच्या धोकादायक टप्प्यावर मशीन कशी उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
शंभर फूट विहिरीत काम करण्याबरोबरच या ढिगार्यामध्ये अडकलेले मजूर बाहेर काढायचे होते त्यामुळे मोठ्या दडपण असतानाही अक्षय ढोले (लाकडी ता इंदापूर )व अमोल बोराटे मलवडी ता (माण जि सातारा )या दोन ऑपरेटरांनी धाडस करून मशीन मालक विजय काळे यांच्या समवेत मशीन उतरवली व मोहीम यशस्वी केली.
याविषयी माहिती देताना मशीन मालक व ऑपरेटर यांनी सांगितले की अवघड ठिकाणी मशीन नेण्याबरोबरच त्या मध्ये अडकलेली माणसे त्यामुळे मनावर मोठे दडपण होते. तसेच काम करीत असताना त्यामध्ये प्लेटा मुरूम दगड लोखंडे रोड याचाही समावेश होता. त्यामुळे काम करणे अवघड होते.
मात्र मशीन मालक काळे यांनी मी तुमच्यासोबत स्वतः मशीन मध्ये थांबतो काळजी करू नका. असे सांगितले. त्यामुळे या चार मजुरांचे मृतदेह दिगाराखालून काढण्यात यश आले असेही ऑपरेटरांनी सांगितले
————————————