इंदापूर ता, 25 : इंदापूर तालुक्यातील एकूण 34 कामांना सामाजिक न्याय विभागाकडून 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली
याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने इंदापूर तालुक्यामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2023 -2024 या वर्षाकरिता मागासवर्गीय वस्तीमध्ये मूलभूत सुविधा पुरवणे व विकास कामे करण्याकरिता 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामधे प्रामुख्याने अभ्यासिका बांधणे,अंतर्गत रस्ते,उद्यान विकसित करणे,सामाजिक सभागृह बांधणे धम्म केंद्र बांधणे,वाचनालय बांधणे ,सुशोभीकरण करणे,आदी कामे केली जाणार आहेत अशी माहिती इंदापूर आमदार आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली .
यावेळी हा निधी एकूण 32 गावांकरिता 34 कामांना मंजुरी देण्यात आली आहेत.भिगवन येथे बुद्ध विहार परिसरात संविधान भवन बांधणे 20 लाख, कळस येथे बुद्ध विहार बांधणे 20 लाख, निमगाव केतकी येथे अण्णाभाऊ साठे नगर सामाजिक सभागृह बांधणे 15 लाख,शेटफळ हवेली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तयार करणे 20 लाख, जांब येथे साठे नगर समाज मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसवणे 10 लाख, कळाशी येथे बौद्ध विहार पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख,
कुंभारगाव येथील बौद्ध नगर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता करणे 10 लाख, निमसाखर येथील भोसले वस्ती येथे रस्ता करणे 20 लाख, बावडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण करणे 20 लाख बोरी येथील मातंग वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख ,वालचंदनगर सांधा रोड ते उबाळे वस्ती रस्ता करणे 10 लाख ,सणसर अशोक नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन पेव्हर ब्लॉक व वॉल कंपाऊंड बांधणे 20 लाख , निमगाव केतकी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर बुद्ध विहार बांधणे ,संरक्षण भिंत बांधणे व ब्लॉक बसविणे 25 लाख
चांडगाव येथे लक्ष्मण साळवे घर ते अगोती रस्ता करणे 10 लाख, जंक्शन येथे अवघडे वस्ती,भोसले वस्ती,गायकवाड वस्ती ,सिद्धार्थ नगर, चव्हाण सरोदे अळी मिसाळ गायकवाड वस्ती ,लोंढे वस्ती सौर प्रकाश व्यवस्था करणे 20 लाख रुपये वडापूरी येथे बुद्ध विहार बांधकाम व सुशोभीकरण करणे 20 लाख, कांदलगाव येथे बुद्ध विहार बांधणे 20 लाख, सुगाव येथे बुद्ध विहार बांधणे 20 लाख, लोणी देवकर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख,न्हावी येथे बुद्ध विहार बांधणी 10 लाख , पळसदेव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 20 लाख , तक्रारवाडी येथे बुद्ध विहार बांधणे व पेवर ब्लॉक बसविणे 10 लाख,
पोंधवडी येथे मातंग समाज मंदिर बांधणे 10 लाख , हिंगणगाव येथे बुद्ध विहार बांधणे 20 लाख, तरटगाव येथे बुद्ध विहार बांधणे 10 लाख, पडस्थळ टाकळी वस्ती येथे बुद्ध विहार कंपाउंड बांधणे 20 लाख, गोखळी येथे बुद्ध विहार बांधणे 10 लाख ,
रुई येथील बौद्ध समाज मंदिर परिसर स्वागत कमान ,संरक्षण भिंत बांधणे 20 लाख , गोंदी येथील,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख, अगोती नंबर 2 येथील समाज मंदिर ते आरडे वस्ती रस्ता करणे 10 लाख , बिजवडी येथील राजवडी येथे अभ्यासिका बांधकाम करणे 10 लाख , रणगाव येथील खरात वस्ती समाज मंदिर बांधणे 10 लाख , टनु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख रुपये या कामांकरिता निधी प्राप्त झाला असून तात्काळ या कामांचे निविदाप्रकिया करून कामे चालू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.